अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना संगमनेर तालुक्यात शुक्रवार (१२ जून) रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास घडली.
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादिवरून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक उर्फ प्रदीप भाऊसाहेब वाकळे (वय ३२, रा.कुबडी मळा, कोठे बुद्रूक, ता.संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी वाकळे याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी बोलावून घेतले.
नंतर घराच्या गच्चीवर नेत तिच्यावर त्याने अत्याचार केला. हा प्रकार त्या मुलीच्या घरी समजल्यावर तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews