अहमदनगर ब्रेकिंग : शेतात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच ओळखीच्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे दुष्कर्म केल्याचे अनेक प्रकार घडले आहे.

नुकतेच पाथर्डी तालुक्यात महिला अत्याचाराची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात एका महिलेस हरबऱ्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे.

तसेच सदर नराधमाने घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास तुला जीवे ठार मारीन अशी धमकी पीडित महिलेला आली. दरम्यान याप्रकरणी योगेश पांडू कराळे (रा. सोमठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्याच्या बाजूला राहणारी विवाहित महिला तिसगावहून पायी मांडवे गावाकडे जात होती.

या महिलेचा ओळखीचा असलेला योगेश कराळे तेथे येऊन या महिलेला शेजारीच असलेल्या हरभऱ्याच्या शेतात नेऊन अतिप्रसंग केला.

या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला ठार मारीन अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलने फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24