अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टर अपघात घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात दरदिवशी अशा अपघातांची नोंद करण्यात येत आहे.
मात्र तरी देखील वाहन चालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नुकताच असाच एक अपघात संगमनेर तालुक्यात घडला आहे.
संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर गाभणवाडी परिसरात होंडा सिटी कारने उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक देऊन अपघात घडल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. अपघातात होंडा सिटी कारचा चालक धीरज देशमुख रा. नागपूर हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिकल माहिती अशी कि, नाशिक पुणे महामार्गावर गाभणवाडी परिसरात होंडा सिटी कारने उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली आहे.या अपघातातील कारच्या जखमी चालकाला संगमनेर येथे तांबे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती समजताच पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने चालकाला कारच्या बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जखमी धीरज देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले जात आहे. जिल्ह्यात ऊस वाहतूक अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.