अहमदनगर बातम्या

‘त्या’ग्रीनफील्ड महामार्गास व्यापाऱ्यांचा विरोध!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  औरंगाबाद-अहमदनगर-पुणे या नव्या सहापदरी राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गास केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी व राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

सध्या अस्तित्वात असलेला मार्ग वळून नव्याने राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे औरंगाबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसणार आहे.

त्यामुळे नेवासा तालुक्यातील व्यापारी व उद्योजकानी या मार्गाला तीव्र विरोध केला आहे. हा नव्याने होऊ घातलेला राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्ग तातडीने रद्द होऊन जुन्याच महामार्गावर भूसंपादन करावे.

अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच खा.लोखंडे यांनी संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून या महामार्गावरील छोट्या-मोठ्या उद्योगांना नवसंजीवनी मिळवून द्यावी.

अन्यथा तालुक्यातील महामार्गावरील व्यापारी एकत्रित जमुन या राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात आंदोलन उभारले असा इशारा दिला आहे.या ग्रीनफिल्ड महामार्गाचे फायदे कमी व तोटेच अधिक आहेत.

हा ग्रीनफिल्ड महामार्ग झाला तर जुन्या महामार्गावरील अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत.अनेकांनी आर्थिक उलाढाल करून प्रसंगी कर्ज काढून रस्त्यालगत जमिनी किंमतीत विकत घेतल्या आहेत.

अनेक कंपन्या,पेट्रोल पंप,व्यापारी संकुले,लहान-मोठे उद्योग धंदे उभारले आहेत.जर नवीन महामार्ग झाला तर जुना महामार्ग कायमस्वरूपी ओस पडेल.

सर्व व्यावसायिक देशोधडीला लागतील,म्हणूनच याच जुन्या महामार्गावर भु-संपादन करून व्यापाऱ्यास नवसंजीवनी द्यावीअशी मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office