अहमदनगर बातम्या

ऊस वाहणारा डबल ट्रेलरमुळेभीषण अपघात; तिघांनी गमावला जीव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  सध्या ऊसतोडणी हंगाम वेगात सुरू असल्याने ऊस वाहतूकिला देखील वेग आला आहे. परंतु, ही वाहतूक करताना ट्रॅक्टरला दोन दोन टेलर लावून ऊस वाहिला जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

यापूर्वी अनेकांनी ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात जीव गमावले असताना श्रीगोंदा तालुक्यात आज पहाटे तीन जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

श्रीगोंदे तालुक्यात उसाच्या ट्रॉलीला कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील तीन तरुण जागेवरच ठार झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.

राहुल आलेकर,केशवराव सायकर, आकाश खेतमाळीस ही मयतांची नावे आहेत. मृत तरुण हे सर्व 18 ते 22 वयोगटातील असल्याची माहिती पुढे येत आहे.

Ahmednagarlive24 Office