अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील दुःखद घटना ! क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील गजानन नगर येथील तरुणाचा क्रिकेट खेळून झाल्यानंतर घशात जळजळीचा त्रास जाणवू लागल्याने त्यास उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवले.

मात्र या दरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली. लोकेश अर्जुन ढोबळे, वय २७ असे या मृत तरुणाचे नाव आहे.

कोपरगाव शहरातील गजानन नगर येथील रहिवासी असलेला लोकेश अर्जुन ढोबळे हा तरुण नेहमीप्रमाणे कोपरगाव शहरातील साई सिटी येथील क्रिकेट ग्राउंडवर सिझन बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी गेला होता.

त्या ठिकाणी प्रॅक्टिस झाल्यावर त्याला घशात जळजळ होत असल्याचे त्याने त्याच्या क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना सांगितले असता त्यांनी लोकेश यास प्राथमिक उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात हलवले.

त्यानंतर त्यास दुसऱ्या खासगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी हलवण्यास सांगितले. त्यानंतर असे करत करत काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नव्हते, तर ज्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होते.

त्यांनी त्यास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. या तरुणास शेवट कोपरगाव शहरातील मानवता हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता लोकेश यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Ahmednagarlive24 Office