Ahmednagar News : महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे . डॉ. जावळे यांनी पूर्वी नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले आहे.
त्यावेळी ते महापालिका वर्तुळात लोकप्रिय ठरले होते. नगरहून बदली झाल्यानंतर करमाळा नगरपरिषदेमधे मुख्याधिकारी, सोलापुर महापालिकेत उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले. आता ते पुन्हा नगरला आयुक्त म्हणून येत आहेत.
त्यांना नगरमध्ये पूर्वीचा अनुभव आहे. आता अधिक अधिकार क्षेत्रात त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या नागरिकांच्या अपेक्षा आहे. नगरला महापालिका आयुक्त म्हणून कोणीही अधिकाऱ्याने अभावानेच कार्यकाळ पूर्ण केला आहे. गोरे यांचीही लवकरच बदली झाली आहे.