अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील वांबोरी भागातील ट्रान्सफाॅर्मर ओव्हरलोड झाल्याने विजेचा खेळखंडोबा होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हा त्रास थांबवण्यासाठी जास्त क्षमतेच्या नवीन ट्रान्सफाॅर्मरची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका केली.
निवेदनात म्हटले आहे, मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचा कारभार सुरू असताना वांबोरी भागातील अर्चना डीपी, पारख डीपी, रामदेवबाबा डीपी, देहरेवेस डीपी अस्तित्वात होत्या.
त्यावर १७७५ ग्राहकांचा वीज पुरवठा अवलंबून आहे. ओव्हरलोडमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरळीत करावा,
तनपुरे हे ऊर्जा राज्यमंत्री असल्याने या मागणीची दखल घेतली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना वांबोरी येथील पांडुरंग मोरे, सचिन पटारे, सचिन साळुंखे, संकेत पाटील, विकास दगलबाज, लक्ष्मण कुसळकर, सचिन गायकवाड, पिराजी धनवटे, उमेश कुसमुडे, देविदास दळवी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved