वाहतूक शाखा मालामाल ; 23 लाखांचा दंड केला वसूल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-मिशन बिगेन अंतर्गत जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली.

यावेळी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेनं कारवाई करत लाखोंचा दंड वसूल केला आहे.

यामध्ये विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा वाहतूक शाखेने कोविड संकटकाळात विविध कलमांतर्गत केलेली कारवाई व दंडवसुलीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या पथकाने आजपर्यंत 11 हजार जणांवर ई-चलन, जिल्हाबंदी, विनामास्क, वाहनाची कागदपत्रे नसणे, वाहनपरवाना,

विना हेल्मेट व ट्रिपल सीट आदींच्या उल्लंघनाबद्दल सुमारे 23 लाख रुपये दंडात्मक कारवाई केली, तसेच 700 वाहने जप्त केली. संचारबंदी व लॉकडाउनच्या काळात होणारी

वाहतूक रोखण्यासाठी संगमनेरमधील जिल्हा वाहतूक शाखा पोलिसांच्या मदतीला सरसावली होती. एक अधिकारी व दोन महिला कर्मचाऱ्यांसह 18 कर्मचाऱ्यांच्या वाहतूक शाखेने पाच महिन्यांच्या काळात कौतुकास्पद कामगिरी बजावली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24