अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली. या घोटाळ्यात तीन टीव्ही चॅनल्सची नाव उघडकीस आली आहेत.
पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी
आज फक्त मराठी व बॉक्स सिनेमाच्या चालकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
दरम्यान, पेड टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर राज्यातील नेत्यांनी रिपब्लिक टीव्हीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
अशातच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील रिपब्लिकवर त्यांच्या प्रसिद्ध ‘शो’च्या नावावरून टीकास्त्र डागले आहे.
तांबे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत एका ट्विट केलं असून याद्वारे त्यांनी ‘पूछता है भारत… इसे क्या कहें?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव घेतले नसले तरी त्यांनी रिपब्लिक टीव्हीवर त्यांच्याच ‘शो’चं नाव असलेल्या ‘पूछता है भारत’वरून लक्ष्य केलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved