नगर- मनमाड रोडवर ट्रक लुटला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव :- नगर- मनमाड रोडवर कोपरगावपासून चार कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यानजीक रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उभ्या आयशरची काच फोडून आत प्रवेश करून मध्यप्रदेशमधील खाचरोद येथील गाडीचे क्लीनर लाखनसिंग जगदीश परमार (वय २८) यांना धाक दाखवून त्यांच्याकडील ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

मध्यप्रदेश येथील खाचरोद (ता. बदनावर, जि. धार) येथील आयशर ट्रकचे चालक व क्लिनर आपला ट्रक मध्यप्रदेशमधील पिथमपूर येथून काही माल आपल्या ट्रकमध्ये घेऊन तो पोहोचविण्यासाठी आंध्रप्रदेशात मदानापूर येथे जात असताना त्यांची गाडी कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यानाजीक येसगाव ग्रामपंचायत हद्दीत बंद पडली.

पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची काळी बजाज पल्सर व त्याच रंगाची विना क्रमांकाची होंडा शाईन मोटारसायकलवर २५ ते ३५ वयोगटातील आरोपी हे तिथे आले व त्यांनी क्लिनरच्या बाजूची काच फोडून गाडीत प्रवेश केला.

शस्राचा धाक धाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा ३३ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

अहमदनगर लाईव्ह 24