खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत.

परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे,

असे भाजपचे नेते सुजित झावरे म्हणाले. योजनेसंदर्भाता माहिती देताना झावरे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेंतर्गत पारनेर तालुक्यासाठी राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्न तून १०० कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत यापूर्वी पारनेर तालुक्‍यातील ६७ गावांसाठी ९४ कोटी १५ लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. आता जलजीवन मिशन अंतर्गत पारनेर तालुक्‍यातील वनकुटे पाणीपुरवठा योजनेसाठी ४ कोटी, ७० लक्ष ८७ हजार रुपये तर वासुंदे पाणीपुरवठा योजनेसाठी ४ कोटी ६० लक्ष ३७ हजार रुपये मंजूर झाले असून,

लवकरच या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुजितराव झावरे पाटील यांनी दिली. दरम्यान, स्व. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात भारत निर्माण ही योजना सुरू झाली.

झावरे उपाध्यक्ष असताना भाळवणी, ढवळपुरी, वासुंदे, हंगा, धोत्रे, सावरगाव, वडगाव सावताळ, पळशी, टाकळी ढोकेश्वर, या गावांसाठी त्यावेळी सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त निध आणला होता.

झावरे यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील अनेक पाणी योजना आजपर्यंत मार्गी लागल्या आहेत. वासुंदे व वनकुटे येथील पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्‍त केले असून, खा. सुजय विखे व सुजित झावरे पाटील यांचे आभार मानले आहेत.