पुढील पाच दिवसात शनिशिंगणापुरात तूर-हरभरा हमीभाव केंद्र सुरु होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत आहे. यामुळे जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्र चालू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यातच आता शनिशिंगणापूर येथे ५ फेब्रुवारी २०२१ पासून तूर-हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहे.

गौरीनंद फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे संचालक नितीन बानकर यांनी केले आहे.

नाफेड, महाएफसीच्या अंतर्गत शनिशिंगणापूर येथे सुरू होत असलेल्या केंद्रात यावर्षी शासनाने तुरीला सहा हजार, तर हरभरा पीकाकरीता ५१०० रुपये असा हमीभाव ठरवून दिला आहे.

ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने तूर, हरभरा विक्री करायची आहे, त्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. हमीभाव नोंदणीसाठी सन २०२०-२१चा पीकपेरा असलेला सातबारा, आधारकार्ड व बॅंक पासबुकची प्रत घेऊन कंपनी कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करावी.

बाजार भावामध्ये अनेकदा चढ-उतार होत असतात. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपली तूर-हरभरा जास्त दरामध्ये शासनाला विकावे, असे आवाहन बानकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24