अहमदनगर बातम्या

खंडित वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा ‘या’ तालुक्यातील शेतकरी घेणार ‘जलसमाधी’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राज्यातील काही भागांमधे वीज बील न भरता, त्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे.त्यामुळे महावितरणला शेवगाव तालुक्यातील देखील वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच किसान महासभा, कम्युनिस्ट पक्ष शेवगाव यांच्यावतीने गुरुवार ९ डिसेंबर रोजी ढोरा नदीत शेतकरी संघटनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो शेतकरी जलसमाधी घेणार आहेत.

यामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सर्व अधिकारी पदाधिकारी, तसेच ऊर्जा मंत्री हे जबाबदार राहतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आजपर्यंत विद्युत रोहीत्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वखर्चातुन भरून आणले, डीपी चढउतार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, रोहीत्रासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ऑइल आणले,

शेतकऱ्याचे खर्चातूनच रोहीत्राचा व इतर खर्च होत आहे, आणि त्यातही शेतीला देण्यात येणारा खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नुकसान भरपाईही वीज महामंडळाने शेतकऱ्याला देणे गरजेचे आहे.

त्यामुळे बील भरण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या खर्चामधुन ही कामे केली आहेत, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा वीज बील मागण्याचा अधिकार नाही व वीजपुरवठा खंडित करण्याचा ही अधिकार नाही,

कन्नड तालुका इंदापूर बारामती नेवासा तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन झाल्यानंतर एकही रुपया वीज बिल न भरता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे मग तेथील शेतकऱ्यांना आणि शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कायदा वेगळा आहे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

Ahmednagarlive24 Office