सराईत दुचाकीचोराकडून बारा दुचाक्या जप्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील सराईत दुचाकीचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांकडून पारनेर पोलिसांनी चोरीच्या बारा दुचाक्या जप्त केल्या. शुभम प्रकाश आहेर (वय २४) यांच्याकडून दुचाक्या ताब्यात घेऊन त्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.

३० नोव्हेंबर रोजी राजेंद्र अप्पासाहेब आहेर यांची दुचाकी (क्रमांक एमएच ४३ बीएल ४९७१) चोरीला गेली. आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेत असताना पोलिसांना पळसपूर येथीलच शुभम आहेर याची माहिती मिळाली.

पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतानाच त्याच्या घराजवळ असणाऱ्या दोन दुचाक्या तसेच पळसपूर येथील बंद घरात लपवून ठेवलेल्या १० दुचाक्या पोलिसांच्या हाती आल्या. या चोरीच्या दुचाक्यांपैकी ७ दुचाक्या विना क्रमांकाच्या आहेत, तर ५ दुचाक्यांवर त्या गाड्यांचे क्रमांक आहेत.

या १२ दुचाक्यांमध्ये होंडा शाईन (एमएच १४ जीएल ११२०), हिरो होंडा स्पेंल्डर (एमएच ०६ जी ४३३५), हिरो स्पेल्डर (एमएच १६ बीके ४२१५), होंडा अ‍ॅक्टिवा (एमएच १२ एसपी ८९९९९), हिरो होंडा १०० एसएस (एमएच १४ एल २२६५) या पाच दुचांक्यासह विना क्रमांकाच्या होंडा शाईन या कंपनीच्या ३,

बजाज डिस्कवर २, हिरो होंडा स्प्लेंडर २ या गाड्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांच्यासह उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, पोलिस कर्मचारी गणेश पंधरकर, शामसुंदर गुजर, भालचंद्र दिवटे, सत्यजित शिंदे, सुरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय चौघुले सहभागी झाले होते. चोरट्यांकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24