सत्तावीस वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- एका 27 वर्षीय तरुणाने छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

दरम्यान हि घटना श्रीरामपूर शहरातील कुंभार गल्ली येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, किरण सुरेश अहिरे (वय 27) या श्रीरामपूर शहरातील कुंभार गल्ली, वॉर्ड नं. 3 या ठिकाणी राहणार्‍या या तरुणाने राहात्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आमहत्या केली.

या तरुणाने आत्महत्या का केली याबाबतची माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी श्रीरामपूर शहरपोलीस ठाण्यात मयत किरणचा भाऊ धनराज सुरेश अहिरे याने पोलिसांत माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढोकणे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24