अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात भ्रष्टाचार मोठ्य प्रमाणात बोकाळले असून, अनेक शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी स्वत: किंवा आपल्या हस्तकामार्फत कामाकरीता सर्वसामान्य नागरिकांना लाचेची मागणी करत असतात.
लाच नाही दिली तर काम होत नसल्याचे अनेक प्रकरणे असून काही दिवसापूर्वी श्रीगोंदा तहसील कार्यालयात जमिनीची नोंद लावण्याकरिता वृध्द महिलेकडून ३० हजाराची रक्कम तलाठी तसेच सर्कल यांनी घेतल्याचे उघडकीस आल्याने त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देखील तालुक्यात मागील आठवड्यात कारवाई केली होती. या पाठोपाठ लिंपणगाव ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विभागाचे वीजबिल थकल्याने वीज पुरवठा खंडित केलेला
वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी लिंपणगाव येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता पांडू पूनाजी मावळी यांना १५ हजारांची लाच घेताना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता.
त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला असल्याने तक्रारदार यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता मावळी यांना विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करुन देण्याबाबत विनंती केली असता.
त्यांनी तक्रारदारास २० हजार रुपयांची मागणी केली. यावर तडजोड करून १५ हजार रूपये देण्याचे कबूल करत दि.५ ऑक्टोबर रोजी लिंपणगाव येथील हॉटेल श्रावणी येथे संबंधित रक्कम स्वीकारताना या उप अभियंत्यास जेरबंद केले.