शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोन आरोपी शेवगाव पोलीसांनी गजाआड केले आहेत. अशोक बाबुराव कदम, लक्ष्मण उर्फ बबलु दत्तात्रय मडके दोघे (रा.गदेवाडी, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ हरिशचंद्र इसरवाडे रा. गदेवाडी यांनी ए.के. ट्रेडिंग कंपनी नावाचे शेअर मार्केट गदेवाडी येथे ५ लाख रुपयांची फसवणुक झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार तीन जणांविरुध्द २५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनिल पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवुन तपास पथक तयार केले.
सुनिल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी अशोक बाबुराव कदम व लक्ष्मण उर्फ बबलु दत्तात्रय मडके हे गदेवाडी तसेच बोधेगाव गावामध्ये गेल्यास मिळुन येतील, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने तपास पथक रवाना करण्यात आले होते.
सदर ठिकाणी तपास पथकाने आरोपीची पाहणी केली असता या गुन्ह्यातील आरोपीला पोलीसांची चाहुल लागल्याने ते पळुन जात असतांना शेवगाव पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने सदर आरोपीला गदेवाडी व बोधेगाव येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिगंबर भदाणे, स.पो.नि. अनिल बागुल, पो.स.ई. अमोल पवार, पो.हे.कॉ. परशुराम नाकाडे, पो.कॉ. शाम गुंजाळ, बाप्पासाहेब धाकतोडे संतोष वाघ, संपत खेडकर, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर यांनी केली असुन पुढील तपास पो.स.ई. अमोल पवार हे करत आहेत.