अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहरात दुकानासमोरील जागेच्या वादातून शिर्डीतील तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तरुणाची प्रकृती गंभीर आहे.
गोळीबार करणाऱ्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी रवी गोंदकर व दीपक गोंदकर या दोघा आरोपींना अटक केली आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर तीन आरोपी अद्याप पसार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी शहरात दुकानासमोरील जागेच्या वादातून शिर्डीतील तरुणावर गोळीबार झाला होता.
शुक्रवारी झालेल्या गोळीबारात सुरज ठाकूर हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सचिन ठाकूर याने दिलेल्या फिर्यादीवरून किरण हजारे, तनवीर रंगरेज, अक्षय लोखंडे,
दीपक गोंदकर आणि रवी गोंदकर यांनी गोळीबार केल्याची म्हंटले आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.