अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालूक्यातील मालूंजा खुर्द येथे विद्युत तार ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना दिनांक १७ फेब्रुवारी रोजी घडलीय.
राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील एकूण दहा जणांना आरोपी करण्यात आले. सचिन भगवान सोळूंके राहणार मालूंजा खुर्द तालूका राहुरी.
या तरूणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सचिन सोळूंके हा तरूण आरोपींना म्हणाला कि, आमच्या जनावरांच्या शेडवरून विद्युत तार ओढू नका. याचा आरोपींना राग आला.
त्यावेळी त्यांनी सचिन सोळूंके व त्याचे वडिल भगवान भानूदास सोळूंके यांना लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच दमदाटी केली. सचिन सोळूंके व भगवान सोळूंके यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सचिन सोळूंके याच्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल अण्णासाहेब सोळूंके, अण्णासाहेब नाना सोळूंके, बजरंग भाऊसाहेब सोळूंके, पांडुरंग भाऊसाहेब सोळूंके, सर्व राहणार मालूंजा खुर्द या चार जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास हवालदार अशोक शिंदे हे करीत आहेत.
तसेच पांडुरंग भाऊसाहेब सोळूंके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पांडुरंग सोळूंके हे त्यांच्या घराचे नवीन विद्युत कनेक्शन चे काम करत होते. तेव्हा आरोपी त्यांना म्हणाले येथे काम करू नका.
असे म्हणून आरोपींनी पांडुरंग सोळूंके तसेच त्यांची आई व भाऊ यांना लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेतील जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
या बाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तो गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानूसार आरोपी सचिन भगवान सोळूंके, सचिन दादासाहेब सोळूंके,
भगवान भानूदास सोळूंके, जयंतराव भानूदास सोळूंके, कल्पना भगवान सोळूंके तसेच त्यांची सून सर्व राहणार मालूंजा ता. राहुरी. या सहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याचा तपास पोलिस नाईक महेश भवार हे करीत आहेत. या दोन्ही घटने बाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.