अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात बारागाव नांदूर येथील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांना ताब्यात घेऊन त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भांडण केल्याचा गुन्हा सोमवार दि 29 जानेवारी रोजी दाखल करण्यात आलाय.
र बारागांव नांदूर येथील दोन गटांत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. दोन्ही घटातील १५ ते २० जण राहुरी पोलिस ठाण्यात आले.
त्या ठिकाणी पोलिस ठाण्याच्या आवारात त्यांच्यात बाचाबाची होऊन दोन्ही गट एक मेकांवर तूटून पडले. दोन्ही गटाकडून एकमेकांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी ताबडतोब दोन्ही गटातील लोकांची धुलाई करत अनेकांना ताब्यात घेवून गजाआड केले. या घटने बाबत पोलिस नाईक गणेश फाटक यांनी फिर्याद नोंदवीली.
त्यानूसार एका गटातील शरद पांडुरंग आघाव, पांडुरंग संभाजी आघाव, राहणार तिळापूर ता. राहुरी. पोपट रोहिदास आघाव राहणार बारागांव नांदूर, राहुरी.
तसेच दुसऱ्या गटातील राजेंद्र बाजीराव आघाव, विजय बाजीराव आघाव, कोंडाजी रामदास आघाव, बाजीराव रंभाजी आघाव सर्व राहणार बारागांव नांदूर ता. राहुरी. अशा दोन्ही गटातील एकूण सात जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.