घंटा गाडी अडवत महिलांचे दोन तास आंदोलन; ‘हे’ आहे कारण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-शेवगाव शहरात महिलांनी घंटा गाडी अडवत दोन तास आंदोलन केले. नगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी येतात त्यांची उंची जास्त असल्याने यात कचरा टाकण्यासाठी महिलांना त्रास होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले.

शहरातील कचरा संकलनाचे काम सध्या नगरपालिकेकडे आहे. त्यासाठी सात घंटागाड्या आहेत. या गाड्यांची बांधणी करताना त्यांची उंची प्रमाणापेक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.

त्यामुळे त्यात कचरा टाकण्यासाठी नागरिकांना व महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा तर ओट्यांचा किंवा उंच जागेचा वापर करून कचरा त्यात टाकावा लागतो.

मात्र गल्लीत गाडी आल्यानंतर अशी उंच जागा उपलब्ध नसल्यास तो कचरा गाडीतील कचरा कुंडीत न जाता काही रस्त्यावर तर काही टाकणार्‍या महिलांच्या अंगावर पडतो.

त्यामुळे गाडीत कचरा टाकणे म्हणजे मोठी जिकिरीची बाब होऊन बसली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घंटागाडीतील कर्मचार्‍यांना सुरक्षेविषयक साधने उपलब्ध नसल्याने ते हातात कचरा घेऊन गाडीत टाकत नाहीत.

त्यामुळे अनेकदा नागरिक व महिलांसोबत वादाचे प्रसंग निर्माण होतात. याच कारणास्तव महिलांनी आंदोलन करत या प्रश्नाकडे नगरपालिकेचे लक्ष वेधून घेतले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24