Ahmednagar News : देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी सोनई येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल संजित महाडिक (रा. वय ३२, रा. मानोरी, ता. राहुरी) व सागर साहेबराव खांदे (वय २३, रा. येवला आखाडा) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून ३० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावट कट्टा, १ हजार रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुसे व ५० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल असा एकूण ८१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोहेकॉ. दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, पोना. रविंद्र कर्डिले, शरद बुधवंत, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, पोकॉ. राहुल सोळंके, अर्जुन बडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.