अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील एका 87 वर्षीय वृद्धाचा, तर शिबलापूर येथील 43 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला.
त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. द तालुक्यातील कासारा दुमाला येथील एका 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्याने, त्यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. तहसीलदार अमोल निकम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तालुक्यातील शिबलापूर येथील 43 वर्षीय पुरुषावरही संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
मात्र, प्रकृती जास्त खालावल्याने शनिवारी रात्री त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांनी त्यास दुजोरा दिला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com