अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत भर पडतच आहे. नुकतेच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar news)
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता
शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता अजूनही काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी दोन विद्यार्थी रॅपिड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या आता सात झाली आहे.
दरम्यान मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने 23 डिसेंबर पर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.