अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नाशिक विभागातील तहसीलदारांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शेवगावच्या तहसीलदारपदी अर्चना भाकड-पागिरे यांची, तर कर्जत तहसीलदारपदी नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्चना भाकड यांनी जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार म्हणून या पूर्वी कामकाज केले आहे. नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.
आता त्यांची नियुक्ती शेवगाव तहसीलदारपदी करण्यात आली आहे. यासोबतच कर्जत येथे नानासाहेब आगळे यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या छगन वाघ यांची बदली करण्यात आली आहे. या सोबतच नाशिक विभागातील नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
यात राहाता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार असलेल्या सचिन म्हस्के यांना तहसीलदार पदी पदोन्नती मिळाली आहे. तहसीलदार म्हणून त्यांची नेमणूक नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com