अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर काहीश्या प्रमाणात मृत्यू देखील होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे.
दरम्यान जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या पनवेल उपतालुकाप्रमुख शोभा चाहेर व कामोठे रहिवासी
सामाजिक संस्थेचे सचिव शिवाजी भोसले यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. दोघेही पारनेर तालुक्यातील दरोडी गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या जाण्याने कामोठे सह पारनेर वर शोककळा पसरली आहे.
दोघांच्याही निधनाची वार्ता समजल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. शोभाताई चाहेर या 46 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे.
कट्टर महिला शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. अनेक आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी लढा दिला आहे. तर कामोठे येथे रहिवाशी शिवाजी सुखदेव भोसले हे 47 वर्षांचे होते .
भोसले यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. ते दरोडी पत संस्थेचे सल्लागार होते. त्याचबरोबर जय हरी महिला मंडळाचे सल्लागार म्हणूनही काम पाहत होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved