अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये खळबळ ! तब्बल 1 कोटींची लाच घेतना पकडले एमआयडीसीचे दोन अधिकारी

Published by
Ahmednagarlive24 Office

भ्रष्टाचार ही समाजाला लागली कीड आहे. परंतु शासकीय असो किंवा गैरशासकीय यंत्रणा असो लाच घेण्यादेण्याचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. अहमदनगर जिल्ह्याची लाच घेण्याच्या काही घटना ताजा असतानाच आता एक खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे.

थोडे तिडके नव्हे तर तब्बल 1 कोटींची लाच प्रकरणात अहमदनगर एमआयडीसीचे दोन अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहा.अभियंता (वर्ग 2) अमित किशोर गायकवाड (वय 32 रा.प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर, अहमदनगर, मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ असे या दोन आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने केलेल्या तक्रारीनुसार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगरमध्ये ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी : छत्रपती संभाजीनगर येथील एक शासकीय ठेकेदार आहे. त्याने नगरमधील एमआयडीसी अंतर्गत 100एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केलेलं होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल झालेले होते. हे बिल निघावे यासाठी या कामाच्या बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेण्याचे काम व हे बिल पाठविण्याचे काम करण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ यासाठी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे समजते.

त्यानंतर त्या शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या पथकाने शुक्रवारी शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या परिसरात सापळा लावून कारवाई केली. त्यावेळी एक कोटी रक्कम गायकवाड याने स्विकारली.

व लगेच गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याची 50 टक्के रक्कम कोठे द्यायची हे विचारले. सध्या तुझ्या सेफ कस्टडीत राहूदे असे समोरून उत्तर आले. लाचलुचपत पथकाने त्याचवेळी त्याला रंगेहात पकडले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office