अहमदनगर बातम्या

तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : काळ्या रंगाच्या चार चाको वाहनातून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्‍यातील बाभूळगाव दुमाला येथे घडली.

या हल्ल्यात हनुमंत साहेबराव माळवदकर व विठ्ठल हनुमंत माळवदकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांनाही भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

काळ्या रंगाच्या चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञातांनी हनुमंत साहेबराव माळवदकर व बिठ्ठल हनुमंत माळवदकर यांच्याबर तलवारीने हल्ला केला. यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर चार चाकी गाडी सोडून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच कर्जतचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह राशीन पोलिसांच्या पथकाने या हल्लेखोरांचा शोध सुरु केला. दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा बापर करून लोकांना सतर्क केले.

Ahmednagarlive24 Office