राहुरी तहसीलच्या आवारातून टेम्पो चोरणारे दोघे रंगेहाथ पकडले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथील महसूल पथकाने कारवाई करून ताब्यात घेतलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रीच्या दरम्यान चोरुन नेत असताना दोन चोरट्यांना राहुरी पोलिसांनी नुकतेच रंगेहाथ पकडले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी येथील महसूल पथकाने (दि. १) नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री वाळू चोरुन नेत असलेल्या एका टेम्पोवर कारवाई करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता.

(दि. २) नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ४.१५ वाजेच्या दरम्यान, दोन भामटे सदर २ लाख रुपयाचा टेम्पो ४ हजार रुपये किंमतीची वाळू, असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल तहसीलच्या आवारातून चोरून नेत होते.

त्यावेळी ड्युटीवर असलेले सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड, पोना. सतीष आवारे, रोहीत पालवे, अंकुश भोसले व तहसील कार्यालयातील शिपाई मच्छिद्र नन्नवरे यांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेबाबत पोलीस नाईक गणेश रमेश लिपने यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आरोपी करण शरद मनतोडे ( वय २०, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी), वैभव बाबासाहेब जाधव (वय १९, रा. आरडगाव, ता. राहुरी), काशिनाथ चव्हाण (पुर्ण नाव माहिती नाही ) (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) व रविंद्र बर्डे (पुर्ण नाव माहिती नाही) (रा. देसवंडी, ता. राहुरी) यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe