राळेगणसिध्दीत साड्या वाटणारे दोघेजण ताब्यात ! पारेनर पोलिसांत गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्वभुमिवर राळेगणसिद्धीत मतदारांना साड्या वाटणाऱ्या दोघांना भरारी पथकाने गुरूवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.

या दोघांनाही तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करून पारनेर पोलिसांत त्यांच्याविरध्द गुन्हा दाखल करण्याच्या सुचना तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिल्या.

राज्यभरातील ग्रामपंचायतीचा प्रचार शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभुमिवर गुरूवारी सायंकाळी गावातीलच दोघंाना मतदारांना साड्या वाटत असताना भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी रंगेहात पकडले.

या दोघासोबत दोन महिलाही होत्या. पथकात महिला कर्मचारी नसल्याने महिलांना ताब्यात घेण्यात आले नाही. पारनेर येथे त्यांना आणून तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पुढे त्यांना हजर करण्यात आले.प्रकरणाची देवरे यांनी पुन्हा शहानिशा केल्यानंतर या दोघंानी आचारसंहितेेचा भंग केल्याचे उघड झाले.

त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसिलदार देवरे यांनी दिले. त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या दोघांविररोधात  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अहमदनगर लाईव्ह 24