अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- मिशन बिगेन अंतर्गत हळहळू सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येत आहे. जेईई व नीट परीक्षा या होणारच असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
यासाठी नगर – मुंबई व नागपूर येथे होणाऱ्या जेईई व नीट परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांसाठी नगर रेल्वे स्थानकावरून उद्या शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक :- नागपूरला जाणारी गाडी नंबर 02167 ही रेल्वे दुपारी 4 वजता नगर स्टेशन वरून सुटणार आह. तर मुंबईला जाणारी गाडी नंबर 01132 हे शनिवारी रात्री 9 वाजता नगर रेल्वे स्थानकावरून सुटेल, अशी माहिती स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे.
जेईई व नीट परिक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष गाड्या नगरहून सोडण्यात येणार आहेत. यासठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु झाले आहे. ज्या विद्यार्थांचे तिकीट आरक्षण निश्चित झाले आहे अशांनाच फक्त गाडीत प्रवेश दिला जाणार आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर मोबाईल नंबर 9503014913 येथे संपर्क साधावा
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved