कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात कारचालकाने दुचाकीस्वारास जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात दि.१४ जून रोजी दुपारी झाला. कार्तिक बंडू आगलावे (मलकापूर, जि.बुलढाणा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गणेश भगत हा गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी मयताचा भाऊ अमोल बंडू आगलावे याने नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालका विरोधात फिर्याद दिली आहे.

त्यावरून अज्ञात कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24