अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-भरधाव वेगात असलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने समोर दुचाकीवर चाललेल्या ऊसतोड मजुराला जोराची धडक दिली. या अपघातात दुहाकीवरील विष्णू श्रावण मोरे (वय ३० वर्षे रा. नांगट,बोरमळी तांडा ता.चाळीसगाव जि.जळगाव) याचा मृत्यू झाला तर कैलास सोनवणे हा जखमी झाला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, ही घटना श्रीगोंदा तालुक्‍यातील पिंपळगाव पिसा ते कोळगाव रस्त्यावर घडली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊसतोड कामगार विष्णू श्रावण मोरे व कैलास जयसिंग सोनवणे हे दोघेजण श्रीगोंदा पिंपळगाव पिसा ते कोळगाव जाणाऱ्या रोडवरील पिंपळगाव पिसा गावच्या शिवारात त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते लेंडी ओढ्याच्या पुलावर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या धडकेत मोरे याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने जबर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला तर कैलास सोनवणे याच्या डाव्या हाताला मार लागुन तो फॅक्चर झाला आहे.या प्रकरणी सोनवणे यांने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोहेकॉ.खेडकर हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24