Ahmednagar News : सध्या राज्यातील अनेक दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. असलेली पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून येत्या शुक्रवारी (दि.8) रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार असण्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात लबडे यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिके जवळजवळ शंभर टक्के पावसाअभावी वाया गेले आहेत.
जमिनीतील पाण्याची पातळी अति खोलवर गेल्याने पिण्याचे पाणी, जनावरांना चारा तर शेतकऱ्यांनी जागायचे कसे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. शंभर वर्षात सर्वात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात पडल्याने निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावय आहे.
याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोपरगाव, संगमनेर व पुणतांबा येथील नुकसान झालेल्या पिकांचे समक्ष पाहणी करणारा असून, शेतकऱ्यांची भेट घेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
निळवंडे कालव्याचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद करणार आहे. शेतकरी आज पिण्याच्या पाण्यासाठी वंचित असून त्यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद करतील. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल, याची शुक्रवारी नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल, यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर शिर्डी लोकसभा संपर्क नेते बबनराव घोलप,
संपर्क प्रमुख माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनेते साजन सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, सहसंपर्क रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, जिल्हाप्रमुख मुजीब शेख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे आदींसह सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी राहणार असल्याचे लबडे यांनी सांगितले.