उद्धव ठाकरे यांच्या करिष्म्याने विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार : कदम

Published on -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त नगर शहर शिवसेनेच्यावतीने शिवसैनिकांच्या रक्तातून त्यांचे रेखाचित्र साकारण्यात आले.

याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, संग्राम कोतकर, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, परेश लोखंडे, दिलदारसिंग बीर, सुरेश तिवारी,

संदिप दातरंगे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, श्रीकांत चेमटे, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, दिपक भोसले, महेश शेळके, संजय आव्हाड, संतोष डमाळे, विष्णू घुले, गिरिष हांडे, भाकरे महाराज, गणेश झिंजे, कैलास शिंदे, अभिजित अष्टेकर, प्रताप गडाख, सुशांत मोकाटे, शाम सोनवणे, जेम्स आल्हाट, सुमित धेंडे, प्रशांत पाटील, संजय सागावकर, स्वराज कदम, अक्षय नागापुरे आदि उपस्थित होते.

आर्टिस्ट गणेश जिंदम यांनी रक्तातून उद्धव ठाकरे यांचे आकर्षक रेखाचित्र साकारले. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यसह देशात शिवसेनेचे कार्य वाढत आहे. मुख्यमंत्री पदावर असतांना त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम केले.

त्याचबरोबर कोरोना काळातील त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण देशाने घेतली. शिवसैनिकांना प्रोत्साहन व ताकद देण्याचे काम ते करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या करिष्म्याने राज्यात शिवसेनेने मोठे यश मिळविले.

आता येर्णाया विधानसभेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी आपल्या रक्तातून त्यांचे रेखचित्र साकारुन, शिवसेना व त्यांच्या प्रति असलेले प्रेम व्यक्त केले आहे. खरे शिवसैनिक हे त्यांच्या पाठिशी आजही खंबीरपणे उभे आहेत, असे प्रतिपादन केले.

यावेळी विक्रम राठोड म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पक्षाची योग्य बांधणी करुन शिवसैनिकांना आपले करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

आज वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्यावर असलेले प्रेम व्यक्त करुन दिर्घायुसाठी प्रार्थना केली असल्याचे सांगितले. याप्रसंगी भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव आदिंनीही मनोगतातून पक्षप्रमुख यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना कृतीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्यावतीने माळीवाडा येथे श्री विशाल गणेश मंदिरात आरती करण्यात आली. तसेच दिवसभर विविध पदाधिर्का- यांच्यावतीने चारा वाटप, शैक्षणिक मदत, अन्नदान, असे उपक्रम राबविण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!