मामे सासऱ्याला अडकवायला गेलेला भाचे जावई गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- विवाहानंतर पत्नीला सासरी येऊ न देणाऱ्या मामे सासर्‍याला अद्दल शिकवायची म्हणून त्याच्या वाहनात गावठी कट्टा ठेवणार्‍या भाचे जावायला त्याच्याच जाळ्यात अडकवत अटक केली आहे.

मुजीबशेख (रा. जखणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी: आरोपी शेख याने प्रेम विवाह केला. परंतु मुलीच्या मामाचा लग्नाला विरोध होता.

त्यांने भाची नांदायला पाठवायची नाही असे सांगून तिला राहुरी येथील घरी नेले. दरम्यान शेख याने नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार तशी केली.

एमआयडीसी पोलिसांनी शेख व त्याच्या पत्नीला घरच्यांसह मंगळवारी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. आरोपी शेख दहा ते बारा साथीदारांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला.

यावेळी पत्नी मामे सासर्‍या ज्या वाहनातून येत होती, त्यामध्ये याने गावठी कट्टा ठेवला. हे करण्यामागे मामे सासर्‍याला गुन्ह्यात अडकविण्याचा शेख याचा डाव होता.

तसेच एका वाहनात गावठी कट्टा असल्याची खबर स्वतः नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना दिली. रजपूत यांनी त्यानुसार कारवाई केली आणि त्या मामला ताब्यात घेतले.

परंतु दरम्यान , तालुका पोलिसांना खबर मिळाली की त्या वाहनामध्ये ठेवलेला गावठी कट्टा आरोपी शेख यानेच ठेवला आहे. पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपी त्याने कट्टा आपणच ठेवला असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी शेख याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अखेर मामे सासर्‍या गुन्ह्यात अकडविणारा भाचे जावई पोलीसांच्या तावडीत सापडला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24