मिशन पंचसुत्री कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात झाली ‘इतक्या’ विक्रमी वृक्ष लागवड; उद्दिष्ठापेक्षा अधिक केले अधिक वृक्षारोपन …!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मोठया प्रमाणात होत असलेले शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जागतिक तापमानात वाढ होऊन शेतक-यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपदांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यावंर मात करुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपन तसेच वृक्षसंगोपनाच्या मोहिमेला अत्यंत महत्त्व आहे.

या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फंत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ, उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) दिलीप सोनकुसळे, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे यांचे मागदर्शनाखाली मिशन पंचसुत्री कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

दि.१५ जुन ते ३० सप्टेंबर या वेळेत दरवर्षी वनमहोत्सव साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर वृक्षलागवडीसाठी लोकांना उदयुक्त करणेसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फंत मिशन पंचसुत्री कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात ५ लक्ष वृक्षलागवडीचे लक्षांक निश्चित करण्यात आले होते.

या मोहिमेला चांगला प्रतिसाद देत जिल्हयात अद्यापपर्यंत ५ लाख ३९ हजार ४२९ वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. यात लोकसहभागाबरोबरच १५ वा वित्त आयोग, मग्रारोहयो अंतर्गत वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुकास्तरावर ग्रामपंचायत कार्यालय, शाळा अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाने, गावठाण परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, इत्यादी ठिकाणी वड, कडुनिंब, करंज,चिंच, सिताफह, जांभुळ, अशोक, बेल इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

सदर वृक्षारोपणासाठी समाजिक वनीकरण, वन विभागामार्फंत शासकीय रोपवाटिकेमधुन रोपांचा मोफत पुरवठा करण्यात आला.

लागवडीबरोबरच वृक्ष संगोपनालाही अत्यंत महत्त्व असल्याने वृक्ष संगोपनासाठी नागरिकांनी तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फंत करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office