अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे अनेक जण बेकार झाले आहे, तसेच नौकर भरती होत नसल्याने या परिस्थितीचा फायदा घेत अनेक ठिकाणी नौकरी लावून देण्याच्या नावाखाली भामट्यांकडून अनेकांची फसवणूक झाल्याची घटना घडत असतात.
अशीच एक घटना घडली आहे. सरकारी नौकरी लावून देण्याच्या आमिषाने पुणे, नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांना कोटीचा गंडा घालणार्या भामट्याला पुणे ग्रामीण हवेली पोलिसांनी गजाआड केले आहे.
विजयकुमार श्रीपती पाटील (वय 54, सध्याराह. सिंहगड रोड, पुणे.मूळ संभाजीनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या ठगाने अकोलेतील सतरा-अठरा व्यक्तींना सुमारे सव्वा कोटीच्या पुढे गंडा घातला आहे.
कोल्हापूर येथे राहाणारे प्रमोद आयरेकर यांनी पोलिसांत बारा लाखाच्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. आयरेकर यांच्या पत्नीला ससून रूग्णालयात नोकरी लावतो म्हणून आरोपी पाटील याने रोख बारा हजार रूपये घेतले होते.
विशेष म्हणजे आयरेकर यांच्या पत्नीची गनिवड झाल्याबाबत बनावट नियुक्तीपत्रही दिले होते. पण पत्यक्ष ससून रूग्णालयात खात्री केल्यानंतर फसवणूक झाल्याचे आयरेकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.अखेर या भामट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.