अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : वडिलांच्या दशक्रियाविधीत मुलाचा दुर्दैवी मृत्यू ! काक स्पर्श होण्याआधीच…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आश्वी संगमनेर तालुक्यातील पिंप्री- लौकी अजमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी घटना घडली. १० दिवसापूर्वी येथील जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते.

गुरुवार दि. २१ रोजी त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असताना काक स्पर्श होण्याआधीच त्यांचा मोठा मुलगा दिलिप (वय ४०) यांचे देखील ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

पिप्री- लौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवार दि. २१ रोजी त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम सुरु होता.

त्यासाठी ग्रामस्थासह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. याचवेळी पिंडाला कावळा शिवण्याचा विधी सुरु असताना हात जोडून उभे असलेले दिलीप दराडे हे अचानक खाली कोसळले.

त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईक यांनी वेळ न दवडता दराडे यांना आश्वी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु दराडे यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले.

ह्रदय विकाराच्या धक्क्याने वडिलापाठोपाठ मुलानेही जगाचा निरोप घेतल्याने आश्वीसह परिसरात शोककळा पसरली होती. दुपारी शोकाकुल वातावरणात दिलीप दराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Ahmednagarlive24 Office