अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली. समजलेल्या माहितीनुसार कावेरी भाऊसाहेब गुंड (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे.
शेतातील विहिरीवर विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान या मृत महिलेचे कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.
कर्जत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने कुळधरण परिसरावर शोककळा पसरली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved