अहमदनगर बातम्या

केंद्रीय मंत्री आठवले व खासदार लोखंडेंनी घेतली माजीमंत्री पिचडांची भेट

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार सदाशिव लोखंडे हे दोघेही जण आले होते.

खासदार लोखंडे यांनी पिचड यांचे दर्शन घेतले तर मंत्री रामदास आठवले आणि माजी मंत्री पिचड यांच्या मध्ये काही महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान आठवले राजूर येथे पिचड यांच्या निवास स्थानी येणार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होती. मंत्री आठवले येण्यापूर्वीच खासदार लोखंडे त्यांच्या भेटीला आले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी खा.लोखंडे यांचे स्वागत केले. शिर्डी लोकसभा खासदार म्हणून काम करताना निळवंडे साठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांचेच मोलाचे मार्गदर्शन झाले असून

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेही निळवंडे पुनर्वसनासाठी मोठे योगदान असल्याची कबुली खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी बोलताना दिली .

Ahmednagarlive24 Office