अहमदनगर बातम्या

केंद्रीय मंत्री आठवले ५ मार्चला संगमनेर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले संगमनेर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यानिमित्त मंगळवारी (५ मार्च) सायंकाळी ५ वाजता संगमनेर बसस्थानक प्रांगणात सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन केले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यावेळी उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी लोकगायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतिकारी भीमगीतांच्या मैफलीचे आयोजन केले. गावागावात कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून जिल्ह्यातील भाजप व रिपाइंचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

या दरम्यान मंत्री आठवले तालुक्यातील रिपाइं कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक उमेदवारीची भूमिका ते स्पष्ट करतील. त्यांच्या उमेदवारीची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांत आहे.

कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, सचिव दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले.

Ahmednagarlive24 Office