राशीन येथील बंधाऱ्यावरील दरवाजावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वाघजाई, कर्मणवाडी, मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती येथील बंधाऱ्यावर शासनाचे वतीने लाखो रुपये खर्चुन शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली यावेत या उद्देशाने बंधाऱ्याला दरवाजे बसवून पाणी अडविण्यात आले होते.

त्यामुळे हजारो एकर शेती ओलिता खाली आली आहे. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु सदर बंधारे सध्या कोरडेठाक पडले आहेत. संबंधित खात्याने बंधाऱ्याला बसविलेले दरवाजे बाजूला काढून ठेवले आहेत. अज्ञात चोरट्यांनी सदर दरवाजे चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे.

ही घटना मोहिते वस्ती व परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पुढील अर्नथ टळला आहे. सदर बंधाऱ्यावरील प्लेटा चोरणाऱ्या अज्ञात चोट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच परिसरातील बंधाऱ्यावरील, विहिरीवरील, शेततळ्यावरील विद्युत पंप, केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन अज्ञात चोरट्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe