जिल्हा बँकेवर कोल्हे यांची बिनविरोध निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव सोसायटी मतदार संघातील अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्हा बँकेवर कोपरगाव येथून विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे समर्थकानी माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. बुधवारी कोपरगाव सोसायटी मतदारसंघात बिपीनदादा कोल्हे, किसनराव पाडेकर व देवेंद्र रोहमारे यांनी माघार घेतली.

अलकादेवी जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी माघार घेतली होती. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू असलेले विवेक इफकोचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आहेत.

विवेक कोल्हे यांच्या रूपाने कोल्हे परिवाराच्या तिसऱ्या पिढीचा बँकेच्या राजकारणात संचालक म्हणून प्रवेश होत आहे. दरम्यान काळे व कोल्हे जिल्हा बँक निवडणुकीत थोरात गटाचे समर्थक आहेत.

आ.काळे व माजी आ.स्नेहलता कोल्हे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी संगमनेर येथे गेले होते. तेव्हाच या मतदार संघातील निर्णय झाल्याचे मानले जात होते.

अहमदनगर लाईव्ह 24