अहमदनगर बातम्या

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ह्या गावात राजकीय पुढाऱ्यांना ‘नोएन्ट्री’ !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नगर तालुक्यातील भातोडी पारगावमध्ये आमदार व खासदारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला आहे.

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा तर नाहीच, उलट त्यांच्या विरोधात चुकीचे विधान केले जात आहे, त्यामुळे गावातील सर्व समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून,

कोणत्याच नेत्याला आम्ही गावात येऊ देणार, असा एकमुखी ठराव झाला आहे. पुढारी गावात आले तर रोषाला सामोरे जावे लागेल असेही ठरावात ग्रामपंचयतने नमूद केले आहे.

या वेळी गावचे सरपंच ज्योती विक्रम लबडे, उपसरपंच राजू नसीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुनीता विक्रम गायकवाड, कैलास कुशाबा गांगर्डे, लक्ष्मण फकिरा लबडे, सुभाष घमाजी कचरे,

सुनीता जालिंदर लबडे, पटेल उल्फत युनुस, मुलाणी मुमताज शाकिर, या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन हा ठराव केला असल्याने आता आमदार, खासदारांना गावात नोएन्ट्री राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office