चाऱ्यांद्वारे पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यातील आवर्षणग्रस्त १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्यांद्वारे लाभक्षेत्रातील दुष्काळी गावांतील पाझर तलावात प्रस्तावित चाऱ्यांद्वारे पाणी सोडले जात नाही,

तोपर्यंत आमरण उपोषण सोडले जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्ते अॅड. योगेश खालकर यांनी दिला. त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंब्यासाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.

रांजणगाव देशमुख येथे अॅड. खालकर बोलत होते. निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, के. टी. वेअर आदी प्रस्तावित चाऱ्यांच्या माध्यमातून भरून देऊन दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाने प्राधान्याने करावी, अशी महत्वपूर्ण मागणी घेऊन

रांजणगाव देशमुख या ठिकाणी दि. १७ सकाळी १० वाजता अँड. योगेश खालकर, डॉ. अरूण गव्हाणे, माजी सरपंच कैलास रहाणे, गजानन मते, मनेगाव ग्रामपंचायत सरपंच अण्णासाहेब गांगवे, संजय बडें आदी कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण गत दोन दिवसांपासून सुरू ठेवले असून या आंदोलनाला पाठिबा व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी तळेगावमार्गे कोपरगाव- संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे, सचिव कैलास गव्हाणे, सिकंदर इमानदार, कौसर सय्यद, भिवराज शिंदे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे, रवींद्र वर्पे, संतोष वर्षे, सुखलाल गांगवे, धनजन वर्षे, शिंदे, रावसाहेब मासाळ, प्रा. सीताराम कोल्हे, सुखदेव खालकर, रामनाथ पाडेकर आदी प्रमुख कार्यकत्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनस्थळी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, अभियंता गायकवाड, श्री साबळे आदींनी भेट देऊन आंदोलनकर्ते अॅड. खालकर यांना आश्वासित केले आहे, मात्र जोपर्यंत डांगेवाडी (काकडी) वेस-सोयगाव, बहदराबाद आदी पाझर तलावात पाणी प्रथम सोडले जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रास्तविक अॅड. योगेश खालकर यांनी केले तर उपस्थितांना बाळासाहेब गोर्डे, धनंजय वर्षे, सुखलाल गांगवे, अनिल खालकर, शिवाजी शेंडगे, अमर देशमुख, कैलास रहाणे आदींनी मार्गदर्शन केले. उपस्थित जलसंपदा अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांवर गलथान नियोजनाचा आरोप करून नागरिकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. आभार सचिन खालकर यांनी मानले