अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मास मार्केट ब्रॅड दरम्यान विक्री पश्चात उत्तम सेवा देणार्या व सलग तीन वर्षे ग्राहकांची प्रथम पसंती ठरलेल्या ह्युन्दाई कंपनीच्या दि ऑल न्यू औरा चे इलाक्षी ह्युन्दाई शोरुममध्ये दिमाखदार सोहळ्यात अनावरण झाले.
पत्रकार अॅड.ललित गुंदेचा, अॅड. सौ.पूजा गुंदेचा व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते या नवीन कारचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारच्या बाजारपेठेत नव्याने दाखल झालेली व ग्राहकांना भुरळ घालणारी दि ऑल न्यू औरा वाजवी दरात तर विविध सोयी-सुविधांच्या संपन्नतेने उपलब्ध झाली असता या कारकडे ग्राहकांचा कळ वाढत आहे.
या कारमध्ये ह्युन्दाई कंपनीने 1.0 टर्बो जी.डी.आय.बी.एस. 6 पेट्रोल इंजन तसेच 1.2 ईको टॉर्क डिझेल इंजिन विकसित केले आहे. हे विकसित तंत्रज्ञान या कारमध्ये उपलब्ध करुन देणारी ह्युंदाई कंपनी आद्यप्रवर्तक ठरली आहे.
तसेच या कारमध्ये 8 इंच स्क्रीन एन.व्ही.एन., स्वेफ्ट बॅक प्रोजेक्टर हेडलँप, प्रोजेक्टर फॉग लँप क्रोम सराऊंड, वंडर वॉरंटी व 3 वर्षे फ्री रोड साईड असिसटन्ट, व्हील एअर कर्टन, स्पोर्टी डायमंड कट अलॉय व्हील,
इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, रिअर पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जर, यूएसबी पॉइंट, क्रुझ कंट्रोल आदी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
कंपनीने सहा इंजन पर्याय सहित 12 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध करुन दिले आहे. बुकिंग करणार्या ग्राहकांसाठी नामवंत बँक व फायनान्स कंपन्यांकडून झीरो प्रोसेसिंग फी शंभर टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.
ही दि ऑल न्यू औरा कार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुममध्ये उपलब्ध असल्याची माहिती शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी दिली आहे.