थकबाकीची जोरात वसुली सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : जिल्हा परिषदेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घसघशीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी विविध विभागांकडून जिल्हा परिषदेला येणे असलेल्या थकबाकीची जोरात वसुली सुरू आहे. थकबाकी वसुलीमुळे इतर वेळी सदस्यांची निधीसाठी होणारी ओढाताण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी माहीती जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समितीची मंगळवारी सभा झाली. त्यात सदस्यांनी विविध सूचना केल्या. त्यानुसार विविध प्रलंबित व बंद पडलेल्या योजना, अपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेची दि.२७ मार्च रोजी अंदाजपत्रकीय विशेष सभा घेण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रशासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.

नव्यानेच अर्थ समितीचा पदभार स्वीकारलेल्या सभापती सुनील गडाख यांनी अधिकाऱ्यांकडून शासकीय यंत्रणांच्या असलेल्या थकबाकीची माहिती घेवून ही थकबाकी वसुलीसाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने महिनाभरापासून थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्याचाच परिणाम जिल्हा परिषदेला थकीत निधी मिळणार आहे.

जिल्हा परिषदेचे मागील वर्षीचे अंदाजपत्रक २८ कोटींचे होते. त्यात सुधारणा करून ते ३२ कोटींचे झाले. जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्क विभाग, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका शिक्षण शुल्क, ग्रामपंचायत सामान्य कर, उपकर, वाढीव उपकर अशा विविध माध्यमातून जवळपास ४८ कोटींची येणे बाकी आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क विभागाच्या २१ कोटींच्या थकबाकीतून १० कोटी रुपयांचा निधी हा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24