अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-आदर्शगाव हिवरे बाजार येथील पाझर तलाव क्रमांक १ धोकादायक बनला असून तातडीने त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे, असे पत्र सरपंच पोपटराव पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
हा तलाव १९७२ मध्ये दुष्काळात तयार करण्यात आला. यंदा गावात सुमारे ७५० मिमी पाऊस झाला. हे प्रमाण सरासरीच्या दुप्पट असून तलावाच्या सांडव्याचे काम अपूर्ण असल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे.
या भरावाची तातडीने दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. दुरूस्ती न झाल्यास हिवरे बाजार, खातगाव, जखणगाव या गावांना धोका निर्माण होईल, असे पवार यांनी म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved